Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Maharashtra SSC Board Result 2023: जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार 10 वीचा निकाल;...

Maharashtra SSC Board Result 2023: जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार 10 वीचा निकाल; असा करा चेक

Subscribe

Maharashtra SSC Board Result लवकरच लागण्याची शक्यता असल्याचं महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच 1 ते 5 जूनदरम्यान दहावी बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. आता Maharashtra SSC Board Result लवकरच लागण्याची शक्यता असल्याचं महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच 1 ते 5 जूनदरम्यान दहावी बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(  Maharashtra SSC Board Result 2023 10th Result in first week of June Check on this site )

दहावीच्या निकालासंदर्भात आता समोर आलेल्या माहितीनुसार, 2 मार्च ते 25 मार्च या कालवाधीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट लवकरच घोषित होणार आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकारिक घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. परंतु लवकरच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कुठे आणि कसा निकाल पाहू शकाल हे जाणून घ्या.

कुठे पाहणार निकाल?

दहावी बोर्डाचा रिझल्ट लागलेला नाही मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रिझल्ट लागणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

- Advertisement -

mahresult.mic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका संकेतस्थळाला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर त्याठिकाणी एसएसपी रिझल्ट 2023 असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक म्हणजेच आसान क्रमांक आणि आपल्या आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. ही माहिती इंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे, तसचं या निकलाची प्रिंट आऊटही घेता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी आवश्यक IMP 

निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून Enter करा. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरिज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

( हेही वाचा: शिवशाहीत आत्महत्या केलेल्या एसटी चालकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; महिला कंडक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल )

11 वीच्या प्रवेशासाठी लागणार ही प्रमाणपत्र

  • दहावीची मार्कशीट Tenth Marksheet
  • दहावीचा डिप्लोमा 10ht Diploma
  • लिव्हिंग सर्टिफिकेट Living Certificate
  • घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टिफिकेट resident certificate/ Domicile
  • जात प्रमाणपत्र ( SC/ ST/OBC ceritificate if you belongs to any minority caste )
  • आधार कार्ड Aadhar Card
  • पॅन कार्ड Pan card
  • पासपोर्ट फोटो Passport size photo
- Advertisment -