घरCORONA UPDATEविद्यार्थ्यांनो 'या' तारखेला लागू शकतो १० आणि १२ वीचा निकाल, तयारीत रहा!

विद्यार्थ्यांनो ‘या’ तारखेला लागू शकतो १० आणि १२ वीचा निकाल, तयारीत रहा!

Subscribe

पेपर तपासणीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे

लॉकडाऊन असला तरी विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी परिक्षा देण्यापासून ते तपासणीपर्यंत सगळ्यालाच विलंब झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे संकेत दिले होते.

पेपर तपासणीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. २७ किंवा २८ जूलैपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. निकालाची तारखी जाणून घेण्यासाठी ‘mahresult.nic.in’ ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्या.

- Advertisement -

यावर्षी सुमारे १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. तर बारावीचे पेपर संपल्यानंतर लगेचच लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते.

१० वी, १२ वी चे ऑनलाईन निकाल कसा पाहाल?

- Advertisement -

अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतील. जुलै महिन्यात निकाल लागल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रथम वर्षाच्या आणि ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होतील.


हे ही वाचा – ‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -