धक्कादायक: उपासमारीची वेळ आल्यामुळे ST कर्मचाऱ्याने केली आत्महत्या!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनं आणखी एक बळी घेतला आहे. एका एसटी कर्मचाऱ्यांनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल धोंडीराम माळी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. ते ३५ वर्षांचे होते. गुरूवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे.

इस्लामपूरच्या आगारात अमोल माळी हे मॅकॅनिक होते. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे अमोल याचा दोन महिन्यांपासून पगार झाला नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे अमोल यांनी आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी पत्नीच्या साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.

कारण अमोल माळी यांच्या पगारावरच कुटुंब अवलंबून होतं. पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. याच नैराश्येतून अमोल यांनी आपली जीवन प्रवास संपवलं. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, ३ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

राज्यात कोरोनाचं संकट कोसळलं आहे. परिणामी राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्यांचं कंबरडं मोडलं आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन काळात एसटी आगार चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.


हे ही वाचा – Video : अपुन ताई है…! रियाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!