Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द

मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द

१४ लाख विद्यार्थांना दिलासा  

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. या प्रस्तावावर आज आपत्ती व व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या १४ लाख विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची सध्याची परिस्थिती, व आजारांच  मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केली आहे. आता त्याच पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द  करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठविला होता. या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावावर मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आपत्ती व व्यवस्थापन विभागा बैठक पार पडली आहे. या बैठकीत मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थितीत होते.  या बैठकीत कोरोनाच्या महामारी काळात  विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.  त्यामुळे आता अधिकृतरीत्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -