महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांसाठी भरती

Maharashtra State Co-operative Bank will be recruiting for various posts
Maharashtra State Co-operative Bank will be recruiting for various posts

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये काही जागांसाठी भरती निघणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षर्णार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज 25 मे 2022 पर्यंत करायचा आहे.

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. प्रशिक्षीर्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी 20, 000 रुपये प्रतिमहिना तर प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी 15, 000 रुपये प्रतिमहिना इतका मिळणार पगार मिळणार आहे.

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी 1,770 रुपये तर प्रशिक्षणार्थी लिपिक 1,180 रुपये भरती शुल्क आकारले जाणार आहे. या उमेदवारांनी बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो या कागदपत्रांची आवश्यक अर्ज करताना लागणार आहे