घरठाणेबाबा रामदेव यांच्या महिलांबाबतच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल

बाबा रामदेव यांच्या महिलांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल

Subscribe

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे.

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. (Maharashtra State Commission For Woman Rupali Chakankar On Baba Ramdev Controversy)

मिळालेल्या माहितीनुसीर, महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा रामदेव बाबा यांनी खुलासा द्यावा, यासाठी महिला आयोग नोटीस बजावणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नव्हे तर, अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं आहे.


हेही वाचा – …तर महिलांनी काही घातलं नाही तरी छान दिसतात, रामदेव बाबा बरळले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -