जितेंद्र आव्हाड अडचणीत; अनंत करमुसेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलिसांना मानवाधिकार समितीने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांच्याव टीका करत एक ट्विट केलं होतं. या ट्विटवर ठाण्यातील सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील ही प्रतिक्रिया होती. त्यामुळे करमुसेला आव्हाडांच्या सुरक्षारक्षांनी त्यांच्या बंगल्यावर नेले. बंगल्यावर आणल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला काही प्रश्न विचारले. या प्रकरणी अनंत करमुसे याने आव्हाडांची माफी मागितली आणि सोशल मीडियावरील पोस्ट डिलिट केली. त्यानंतर त्याला वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या तरुणानेच अनोळखी व्यक्तींविरोधात मारहाण आणि अपहरण प्रकरणी तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्याही कार्यकर्त्यांनी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.


तसेच, या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करमुसे याने मुंबई उच्च न्यायालयात मागणी केली होती. ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.