घरमहाराष्ट्रराज्याच्या पोलीस दलात मोठी उलथापालथ; अनेक अधिकाऱ्यांची खांदेपालट

राज्याच्या पोलीस दलात मोठी उलथापालथ; अनेक अधिकाऱ्यांची खांदेपालट

Subscribe

सदानंद दाते मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तपदी तर भूषणकुमार उपाध्याय नागपुरातून मुंबई वाहतूक शाखेत

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांना अखेर आज मुहूर्त मिळाला असून पहिल्या टप्प्यात १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपिन कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण मधून स्वतंत्र काढण्यात आलेल्या मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय यासाठी परखड आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या सदानंद दाते यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले संजय कुमार यांची बदली अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे करण्यात आली आहे. तर बिपिन कुमार सिंग यांच्या जागी आता व्ही. के. चौबे अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे काम पाहतील. राजेंद्र सिंग हे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्नशील असलेले आशुतोष डुंबरे यांची घोर निराशा झाली असून राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त पदी नेमण्यात आले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त परी असलेले आम्ही तेच कुमार यांची नियुक्ती नागपूर पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर जय जीत सिंह आता अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे नियुक्त करण्यात आले आहेत. ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण पोलीस क्षेत्राचे विभाजन करून तेथे मीरा-भाईंदर वसई-विरार साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन झाले असून या पहिल्याच पोलीस आयुक्तालय क्षेत्रासाठी ज्येष्ठ व कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून हाती असलेल्या सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

दीपक पांडे नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी, प्रताप दिघावकर विशेष महानिरीक्षकपदी

मुंबईतील सुधार सेवेचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांची नियुक्ती नाशिक पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे तर महिला अत्याचार प्रतिबंधक पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदी करण्यात आली आहे. प्रताप दिघावकर हे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांनी पैकी ओळखले जातात. मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची नियुक्ती सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग विशेष पोलिस महानिरीक्षक पदी करण्यात आली आहे दुसरे पोलीस आयुक्त राजकुमार भटकर यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात प्रशासन सर्व आयुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेअरिंग दूरचे यांची नियुक्ती मुंबईच्या सुधार सेवेच्या पोलीस महानिरीक्षक पदी करण्यात आली आहे कर नांदेड चे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची नियुक्ती कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी करण्यात आली आहे.

रजनीश सेठ अँटिकरप्शन मध्ये तर मिलिंद भारंबे मुंबईच्या क्राईम ब्रँच मध्ये

गृह खात्याने जारी केलेल्या आजच्या बदल्यांमध्ये मुंबईतील पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलीस मुख्यालयातील कायदा व सुव्यवस्था महासंचालक रजनीश सेठ यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांना गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्था सर्व पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील प्रशासनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पोलीस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महा निरीक्षक पदी नियुक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -