घरमहाराष्ट्रशरद पवारांना भारतीय कुस्ती संघटनेचा धक्का: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच बरखास्त

शरद पवारांना भारतीय कुस्ती संघटनेचा धक्का: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच बरखास्त

Subscribe

भारतीय कुस्ती संघटनेच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे संलग्नता रद्द करण्याचा इशारही देण्यात आला होता

महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदचं बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचा हा निर्णय शरद पवारांसाठी एक धक्का मानला जात आहे. कारण गेली अनेक वर्षे शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजित करणे अन्य त्यासंबंधित निर्णय घेतले जातात. मात्र या नियमांनुसार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं कुस्ती स्पर्धांचे आयोजन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदचं भारतीय कुस्ती संघटनेने बरखास्त केली आहे. यामुळे राज्यातील कुस्ती संचलनासाठी पुढील काही दिवस हंगामी समितीची निवड केली जाईल. अशी माहिती मिळत आहे. या माध्यमातूनचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह अन्य निर्णय घेतले जातील. . तसेच भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार काही जिल्हा संघटना आणि काही पैलवानांची होती. या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. 15 वर्षाखालील गटातील कुस्ती स्पर्धा आणि 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तयारी दर्शवली नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे देखील परिषद बरखास्ती मागील एक कारण सांगितले जात आहे.

- Advertisement -

भारतीय कुस्ती संघटनेच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे संलग्नता रद्द करण्याचा इशारही देण्यात आला होता. पण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून कोणतीच पाऊले उचलण्यात आली नाही त्यामुळे अखेर हा निर्णय घेतला गेला.

देशात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मोठा नावलैकिक आहे, महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा या गाजवल्या आहेत. भाजपचे खासदार बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत तर विनोद तोमर सचिव आहेत. यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पद शरद पवार सांभाळत आहेत. तर बाळासाहेब लांडगे गेली 40 वर्षांहून अधिक काळ या परिषदेचे सचिव आहेत. मात्र बाबासाहेब लांडगे हे मनमानी कारभार करत असल्याचे म्हणत अलीकडेच काही पैलवानांनी आंदोलन केले होते.

- Advertisement -

तसेच भारतीय कुस्ती महासंघाकडे याची तक्रारही केली होती. यानंतर अखेर ही महाराष्ट्रा कुस्तीगीर परिषदचं बरखास्त करण्यात आली आहे.. या बरखास्तीनंतर आता नव्याने निवडणूक घेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात नावजलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र ही परिषद बरखास्त झाल्याने शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


सत्ता गेल्यानंतर शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न; पदाधिकारी, नगरसेवकांकडून घेतले जाणार निष्ठेचं प्रतिज्ञापत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -