राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांत गारठा वाढला

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुलाबी थंडी जाणवू लागलंय. राज्यातील पुणे, सातारा, नाशिकसह इतर जिल्ह्यांत तापमान घसरलंय. महाबळेश्वरमधील तापमान 10.4 अंशांवर पोहोचले असून वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. शिवाय पुण्यामध्ये देखील हुडहुडी भरू लागली आहे. नाशिकसह धुळ्यातही गारठा वाढत असल्याचं जाणवू लागलं आहे. दरम्यान, या थंडीमुळे रब्बी पिकांना आवश्यक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

नाशिकमध्ये भरली हुडहुडी
नाशिकमध्ये देखील आता थंडीला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. नाशिकचे तापमान 13 अंश सेल्सिअसवरुन 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धुके देखील परसले आहेत. नाशिक व्यतिरिक्त धुळे जिल्ह्यातही थंडीचा पारा वाढला आहे. धुळ्यातील तापमान आज 8.2 अंशावर पोहोचले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात धुके पाहायला मिळत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोटीचा आधार घेत आहेत.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या गारठा वाढला असून हवामान कोरडे झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्रीचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी होते. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्याचे तापमान हे 12 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले होते.

बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हिमालयातही बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. परिणामी उत्तकरेकडच्या राज्यांतील तापमानात कमी होणार आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा पुढचे तीन दिवस तापमान कमी राहणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान 2-3 अंशांनी कमी होणार आहे. 23 नोव्हेंबरपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 


हेही वाचा :

थंडीची चाहूल! कोरड्या हवामानामुळे राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे