
राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. एरव्ही हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. नंतर पावसाळा. पण बदलत्या हवामानानुसार या चक्रात काहीसा बदल होणार आहे. कारण हिवाळा संपून उन्हाळ्याऐवजी तुम्हाला काही दिवस पावसाळा अनुभवता येणार आहे. होय. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवलाय.
राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. ४ ते ६ मार्च या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
2 Feb:
Under influence of a N-S trough in lower level:🔸Isolated light ☔️rainfall is likely over North #Maharashtra ,south MP & Gujarat during 4-6 March.
🔸Isol light/mod thunderstorm activity likely over West MP on 4-5; over East MP on 5-6 & over #Vidarbha on 6 Mar.
– IMD pic.twitter.com/X27Ypvs4OZ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 2, 2023
तर विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्याआधी म्हणजेच पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाहीच, सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस अतिशय कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळणार नाहीच.