घरमहाराष्ट्रराज्यात तापमानाचा पारा वाढणार! कोकणात उष्माघाताचा अंदाज, वाचा सविस्तर...

राज्यात तापमानाचा पारा वाढणार! कोकणात उष्माघाताचा अंदाज, वाचा सविस्तर…

Subscribe

मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज दिला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. पालघर, नाशिक तसंच बुलढाणा जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचं संकट महाराष्ट्रावर कोसळलंय. अशात अवकाळी पावसानं हवेत गारवा सुटल्यानंतर पुन्हा अंगाची लाहीलाही करणारी बातमी येत आहे. राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्यानं उकाड्यातून सुटका होणं दूरच, उलट तो वाढण्याचाच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात ३० अंश सेल्सिअस तापमान असून कोकणात मात्र, ५ ते ६ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सोबतच कोकणातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.

- Advertisement -

यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. उर्वरित तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -