घरताज्या घडामोडीRemdesivir, Oxygen पुरवठ्यासाठी महाराष्ट्राने काढले ग्लोबल टेंडर

Remdesivir, Oxygen पुरवठ्यासाठी महाराष्ट्राने काढले ग्लोबल टेंडर

Subscribe

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक अशा अनेक देशातून पाच गोष्टींसाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, पीएस प्लॅंट, मेडिकल लिक्विड ऑक्सिजन, रेमडेसिवीर, ऑक्सिजन स्टोरेज यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. राज्य सरकारने याबाबतची जागतिक निविदा काढली आहे. तसेच तीन दिवसांमध्ये या निविदेवर प्रतिसाद अपेक्षित आहे. डॉ राजेश टोपे या निविदेबाबत सांगताना स्पष्ट केले की स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या स्वरूपातील ही निविदा (EOI) आहे. त्यामुळे यासाठी जगभरातून प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे. या संपुर्ण निविदा प्रक्रियेबाबतचे अधिकार हे एम्पॉवर्ड कमिटीला देण्यात आले आहेत. या निविदा प्रक्रियेतील अटी व शर्थींच्या बाबतीत समितीला अधिकार देण्यात आले आहे.

जागतिक निविदेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश ?

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ४० हजार
पीएस प्लॅंट १३२
लिक्विड ऑक्सिजन २५ हजार लिटर
ऑक्सिजन स्टोरेज आयएसओ टॅंक २७
रेमडेसिवीर इंजेक्शन १० लाख़

केंद्राकडून आणखी रेमडेसिवीर इंजेक्शन गरजेचे 

सध्या महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा ४ लाख ३७ हजार इंजेक्शनचा कोटा मिळाल्याने आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्याची दररोज ६० हजार इंजेक्शन्सची मागणी आहे. पण सध्या ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला केंद्राकडून मिळत आहेत. याआधीच्या २६ हजार इंजेक्शनच्या तुलनेत ४० हजार इंजेक्शनची वाढलेली मागणी ही दिलासा देणारी आहे असे टोपे म्हणाले. रेमडेसिवीरचा वापर गरजेनुसार होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अनेक रूग्णांच्या बाबतीत १०० टक्के समाधान होऊ शकत नसले तरीही राज्याला पूर्वीच्या तुलनेत कोटा वाढवून मिळाला असल्याचेही टोपे म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -