Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई, पुणेकरांसाठी धावणारी 'डेक्कन क्वीन' अखेर २६ जूनपासून पुन्हा होणार सुरु

मुंबई, पुणेकरांसाठी धावणारी ‘डेक्कन क्वीन’ अखेर २६ जूनपासून पुन्हा होणार सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबई, पुणेकरांसाठी धावणारी ‘डेक्कन क्वीन एक्सप्रेस’ कोरोनामुळे काही काळ बंद होती. मात्र ही एक्सप्रेस २६ जूनपासून पुन्हा मुंबई आणि पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या डेक्कन एक्सप्रेसला व्हिस्टाडोम कोचही जोडण्यात आले आहेत. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे.

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी ही एकमेव ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस मे महिन्यापासून बंद होती. त्यामुळे मुंबई-पुणेदरम्यान नोकरिनिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल सुरु होते. डेक्कन क्वीन बंद असल्याने अनेक प्रवाशांना जीव धोक्यात घालून मुंबई- पुणे असा प्रवास खासगी वाहन किंवा दुचाकीने करावा लागत होतो .मात्र आता प्रवाशांची गैरसोय थांबणार असून सर्वांना दिलासा मिळणार आहे. विशेष डेक्कन एक्स्प्रेस २६ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी ७ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.

- Advertisement -

त्यानंतर दुसरी डेक्कन एक्स्प्रेस विशेष २६ जूनपासून दररोज दुपारी ३.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

परंतु व्हिस्टाडोम कोचसह धावणारी डेक्कन क्वीन आता प्रवाशांना अधिक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही घेता येणार आहे. सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई -मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या आदींचा समावेश आहे.


IndiGo कडून प्रवाशांना आकर्षक ऑफर! Covid Vaccine घेतलेल्यांना मिळणार भाड्यात सूट


- Advertisement -

 

- Advertisement -