घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील Unlock संदर्भात आरोग्यमंत्री टोपेंनी दिले स्पष्ट संकेत; म्हणाले...

महाराष्ट्रातील Unlock संदर्भात आरोग्यमंत्री टोपेंनी दिले स्पष्ट संकेत; म्हणाले…

Subscribe

येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे काही टप्पे देखील लागू केले गेले. मात्र त्यानंतर अनलॉक करून राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना धार्मिक स्थळे कधी उघडणार?, शाळा कधी उघडणार?, व्यायामशाळांना परवानगी कधी मिळणार?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना खूप मोठे संकेत दिले आहेत.

यावेळी राजेश टोपे यांनी अनलॉक प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले. तर “कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे,” असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. ५० टक्के ग्राहक क्षमतेच्या अटीवर हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. एसटी सोबतच खासगी बस वाहतूकही १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.


Corona In Maharashtra: दिलासादायक! आज दिवसभरात १७,३२३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -