घरमहाराष्ट्रसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार गुजरातच्या सिंहाची जोडी!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार गुजरातच्या सिंहाची जोडी!

Subscribe

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरात मध्ये जाणार अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यासाठई उभय राज्यांत करार झाला असून ज्याला केंद्राकडून मंजुरी मिळविणार

अहमदाबाद : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यत बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. गुजरातचे वन राज्य मंत्री जगदीश विश्वकर्मा व सुधीर मुनगंटीवार यांच्यात 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे चर्चा झाली.

महाराष्ट्राला सिंहाची जोडी तर गुजरातला वाघाची जोडी मिळणार आहे. सध्याचे राज्य सरकार जंगलातील प्राणी वाढविण्याचे काम करत आहे.आणखी अनेक निर्णय घेतले जातील. असे यावेळी मुनगंटीवार म्हणाले.  सदर प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव ) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

- Advertisement -

त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबरला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.


PFI च्या 8 राज्यांतील 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी; औरंगाबाद सोलापूरमधून काही संशयित ताब्यात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -