Live Update: जीवाला धोका असल्याचे काही इनपूट्स – सुषमा अंधारे

maharashtra politicas Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan satyajeet tambe cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray

जीवाला धोका असल्याचे काही इनपूट्स – सुषमा अंधारे

पोलिसांनी घराबाहेर न पडण्याच्या दिल्या सूचना


११ वर्षाच्या तरुणाची सेस्कटॉर्शनमुळे आत्महत्या, पुण्यातील प्रकार


राज्याचे पणन सहसंचालक अधिकारी बेपत्ता, साताऱ्यातील शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार

अधिकारी शशिकांत घोरपडे बेपत्ता, नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय


राज्यात राजकारणापलीकडे बोललं जात नाही- दीपक केसरकर

ऋतुजा लटके यांनी घेतली शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट


भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते- उद्धव ठाकरे


लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

उद्या सकाळी ११ पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

राजीनाम्यावर निकाल मागण्याचा अधिकार नाही- पालिकेचे वकील

लटकेंच्या याचिकेत तथ्य नाही, पालिकेच्या वकिलांचा दावा


मुंबईत गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात, दादर, घाटकोपर परिसरात मुसळधार पाऊस


सरकार बदलल्याने राज्यात परिणाम जाणवतोय, विकासाची कामे वेगाने सुरु आहेत – मुखमंत्री शिंदे


ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी, राजकीय दबावापोटी राजीनामा मंजूर करण्यात आला नाही – लटकेंकडून कोर्टात युक्तिवाद


तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला शिंदे सरकारचा आणखी एक धक्का, ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागात मंजुरी दिलेली सर्व विकासात्मक कामे रद्द


गोवा – हैद्राबाद विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, विमानातून धूर येऊ लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. स्पाईस जेटच्या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित


ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला पत्र, चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप


हिजाबवरील बंदीचा वाद आता सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठाकडे


हिजाबबंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता


ब्राझीलला मागे टाकत भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकांवर, यंदाच्या गाळप हंगामानंतर भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्यातही महाराष्ट्र आघाडीवर


विक्रोळीजवळ इनोव्हा कराचा अपघात, दोघांचा मृत्यू तर सात प्रवासी जखमी


प्रबोधन यात्रेचा आजचा दुसरा दिवस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा आज नवी मुंबईत असणार आहे. या यात्रेत सुषमा अंधारे यांच्यासह अरविंद सावंत, राजन विचारे, भास्कर जाधव ही नेतेमंडळी जनतेला संबोधित करणार आहेत, दुपारी 4 वाजता, विष्णुदास नाट्यगृह, वाशी येथे ही यात्रा होणार आहे.


अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार


सोलापुरात सीना नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


हिजाब प्रकरणी सुप्रीम कोर्टत आज निकाल


ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर आज सुनावणी, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी पालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


पुण्यात आज जोरदार पावसाचा अंदाज


राज्याच्या काही भागांत यलो अलर्ट

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बुलडाणा, अकोला, गोंदिया, वाशीम, अमरावती, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ.