घरCORONA UPDATEMaharashtra unlock : राज्यात अनलॉकला सुरुवात, तुमच्या जिल्ह्यात काय राहिल सुरु आणि...

Maharashtra unlock : राज्यात अनलॉकला सुरुवात, तुमच्या जिल्ह्यात काय राहिल सुरु आणि काय बंद?

Subscribe

पालघर जिल्ह्यात अद्याप अनलॉक नाही

राज्यात कोरोनाचा वाढत उद्रेक पाहता फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जवळपास अडीच महिन्यांचा लॉकडाऊनमुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जात आहे. राज्यातील अनेक भागांतील निर्बंध शिथिल करत पुन्हा अनलॉकची घोषणा झाली. यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊन न उठवता ५ टप्प्यामध्ये अनलॉक करण्यासाठी नियमावली आखली आहे. या नियमावलीनुसार तुमचा जिल्हा किंवा शहर कोणत्या लेव्हलमध्ये आहे? किंवा तुमच्या जिल्ह्यात काय राहिल सुरु आणि काय बंद? याची माहिती दिली आहे. जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याबद्दल…

मुंबईत पुढील आठवड्यात होईल योग्य निर्णय

मुंबई महानगरपालिकेने अनल़ॉकची नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. परंतु राज्य सरकारच्या कोरोनासंबंधीत जाहीर केल्या गाईडलाईन्समध्ये मुंबई लेवल तीनला आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ५.३० टक्के आहे. मात्र पुढील आठवड्यापर्यंत पॉझिटिव्ह रेच सुधारण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळए पुढील आठवड्यात इतर पालिकांसह चर्चा करुन मुंबई महानगरपालिका योग्य निर्णय घेणार आहे, मात्र राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, मुंबई हॉटेल्स, सलुन, पार्लस, दुकानांना सुट मिळाली आहे.

- Advertisement -

पुण्यात सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरु राहणार

पुण्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काही भागांमध्ये अद्याप रुग्णसंख्या जैसे थेच आहे. त्यामुळे पुण्यातील जिल्हा प्रशासनाने सरकारच्या सुधारीत नियमावलीनुसार पुण्याच तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू केले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने पुन्हा सुरु होणार आहेत. ही सुधारीत नियमावली आजपासून संपूर्ण पुणे शहरात लागू होणार आहे. तर संपूर्ण पुणे जिल्हा लेव्हल 3 आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका वगळून पुणे जिल्हा लेव्हल 4 येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा लेवल ४ मध्ये

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२.६० टक्के असून ऑक्सिजन बेड्सवरील रुग्णसंख्या ६६.६५ टक्के इतकी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सरकारच्या आदेशानुसार लेवल चारमध्ये मोडतोय. त्यानुसार साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ७ जून पासून पूर्ण अनलॉक होणार नाही.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात अद्याप अनलॉक नाही

पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून मृतांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे पालघर जिल्हा सध्या तिसऱ्या श्रेणीत असून जिल्ह्यातील कडक निर्बंध अद्याप कायम आहेत. शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकाडाऊन असून इतर दिवशी अत्यावश्यक सेवा आणि ठराविक दुकानं सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू आहेत. तर सलून, स्पा आणि जिम पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे अजुनही पालघर जिल्हा प्रशासनाकडून अनलॉकबद्दल कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

वर्धा जिल्हा लेवल तीनमध्ये

वर्धा जिल्हा सध्या लेवल तीनमध्ये असल्यानं मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकान, व्यवसाय दररोज सकाळी ७ ते ४ तर इतर सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, मॉल, चित्रपट, नाट्यगृहे बंद असणार आहेत.

बुलढाण्यात दुकाने सुरु करण्याची मागणी

बुलढाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १ टक्केपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात सध्या लेव्हल ३ लागू आहे. त्यामुळे आता दुकाने सुरू करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

सांगलीत लॉकडाऊन उठल्यास गंभीर स्थिती 

सांगली जिल्ह्याचा समावेश हा चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असला तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आजही आयसीयूमध्ये २०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जर पूर्ण लॉकडाऊन उठवला तर पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत आमचा सकारात्मक विचार आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणखी कमी आला की येत्या दोन दिवसात पुन्हा बैठक घेऊन अनलॉकबाबत निर्णय घेऊ असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

१) कोल्हापूर महापालिकेचा लेव्हल ४ मध्ये समावेश.

२) सातारा जिल्हा लेव्हल ४ मध्ये गणती होत आहे.

३)औरंगाबाद शहर पहिल्या लेव्हलमध्ये आहे तर ग्रामीण दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे.

४) पिंपरी चिंचवड महापालिका ५ ते १० टक्के दर या गटात येत आहे.

७) सोलापूर महानगरपालिका दुसऱ्या तर सोलापूर ग्रामीण हद्द तिसऱ्या लेव्हलमध्ये.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ जिल्ह्यांचा समावेश

सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर यांसह अकोला, बीड, उस्मानाबाद, पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Monsoon 2021 : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, येत्या आठवड्याभरात मुंबईत पोहचण्याची शक्यता- हवामान विभाग


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -