घरताज्या घडामोडीनिर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी वाढली; मुख्यमंत्र्यांचे त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन

निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी वाढली; मुख्यमंत्र्यांचे त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच मॉल्स सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. परंतु, केवळ कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल्समध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच निर्बंधात शिथिलता देण्यात असली, तरी जबाबदारी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आपण निर्बंध शिथिल केले असेल आणि तिसरी लाट येणार की नाही याचे अंदाज बांधत असलो, तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे, तर देशासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. त्यामुळे यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे. यापुढे राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागण्यास सुरुवात झाल्यास राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती. त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की (सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोविडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्येहा पुन्हा मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. या परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. आता मर्यादित प्रमाणात का होईना, पण लोकल प्रवासाला मान्यता देण्यात आली. आता हॉटेल, उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत. इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत असून यावरही निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – १५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत खुले राहणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -