घरमहाराष्ट्रटाळे उघडणार ! सोमवारपासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉक!

टाळे उघडणार ! सोमवारपासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉक!

Subscribe

अनलॉकच्या प्रक्रियेत पाच टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात ५ जिल्हे, तिसर्‍या टप्प्यात १८ जिल्हे तर चौथ्या टप्प्यात दोन जिल्हे आणि पाचव्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सरकारने लागू केलेल्या पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात येणार्‍या जिल्ह्यांत व शहरात कमीत कमी निर्बंध असतील आणि पाचव्या टप्प्यात असणार्‍या जिल्ह्यात सर्वाधिक कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्याचा समावेश पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढण्यात आला असला तरी राज्यात काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनलॉकची प्रक्रिया पाच टप्प्यात सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत राज्यात सावळा गोंधळ सुरू होता. मात्र, शनिवारी पहाटे मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाराष्ट्र अनलॉकच्या सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोमवार ७ जून पासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रशासाकीय पातळीवर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पहिला टप्पा
अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, वर्धा, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

काय सुरु?
पहिल्या टप्प्यातील १८ जिल्ह्यांमध्ये मॉल, थिएटर्स आणि सर्व दुकाने सुरळीत सुरू राहतील.

- Advertisement -

दुसरा टप्पा
हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

काय सुरु?
दुसर्‍या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये मॉल्स, थिएटर, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. बस सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

तिसरा टप्पा
अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली मुंबई, ठाणे, नाशिक, वर्धा, बीड, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश केला आहे.

काय सुरु?
तिसर्‍या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील. तर इतर दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार याच दिवशी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील. दुपारी दोन वाजल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येईल. हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

चौथा टप्पा
बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

काय सुरु?
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील.सार्वजनिक उद्याने, मैदान, सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू राहतील.

पाचवा टप्पा
पाचव्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पुढील काही आठवड्यात एखाद्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात करण्यात येईल. पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -