घरमहाराष्ट्रशिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज, नॉट रिचेबल असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज, नॉट रिचेबल असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

Subscribe

विधानपरिषदेचे मतदान झाल्यापासून हेवी वेट नेते, पक्षाचे विधीमंडळ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते मागील १२ तासांपासून नॉट रिचेबल आहेत

शिवसेनेचे ५५ आमदार आणि सहयोगी आमदार ९ असे मिळून ६४ आमदार असते वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार २६ चा कोटा घेऊन काटावर विजयी झाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून शिवसेनेची १० पेक्षा जास्त मते फुटली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरची नाराजीच यातून दिसते.

विधानपरिषदेचे मतदान झाल्यापासून हेवी वेट नेते, पक्षाचे विधीमंडळ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते मागील १२ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटचं शिंदेंना वारंवार डावलले जात असल्यामुळे अनेक आमदारांचे फोनही नॉट रिचेबल होते. शिवसेनेला फाटाफुटीपासून रोखण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास एक बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेचे काही नेते आणि आमदार उपस्थित होते मात्र मंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते.

- Advertisement -

शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर, आमशा पाडवी यांना सेनेकडे जास्त मते असतानाही केवळ कोट्यापूर्तीच २६ – २६ अशी एकूण 52 मते मिळाल्याने शिवसेनेचीच अनेक मते फुटली आहेत, याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी १२ वाजता तात्काळ बैठक बोलावली असून या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का? त्यांचे समर्थक आमदार या बैठकीला येणार का हे काही तासात स्पष्ट होईल.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. मात्र शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल १२ मतं फुटल्याचे म्हटले जातेय. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. प्रहार संघटनेचे २, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष ६ अशी एकूण ६४ मतांची संख्या शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ५२ मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे ३ आमदार फुटल्याचे यातून स्पष्ट होतेय मात्र गुप्त मतदानामुळे मत फुटलेल्या आमदारांबद्दल सांगणे सध्या अवघड आहे. यामुळे शिवसेना पक्षात फाटाफुटीचे राजकारण सुरु होणार असल्याची चर्चा रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.


या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली – देवेंद्र फडणवीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -