‘त्या’ अदृश्य हातांचेही मनापासून आभार: फडणवीसांचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

maharashtra vidhan sabha live bjp devendra fadanvis criticism congress

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासमत ठराव जिंकला, याकरिता अप्रत्यक्षपणे ज्या सदस्यांनी प्रचंड मतांनी पारीत केला त्यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. अशा शब्दात फडणवीसांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकचं हशा पिकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बहुमत चाचणीवेळी 164 मतांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला. यावेळी शिंदे गटातील सर्व आमदारांनी त्यांचे आभार मानले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावावर भाषण दिले. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे तोंड भरून कौतुक केले.

फडणवीस म्हणाले की, शिवसेना भाजपचे युती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. या सभागृहात आणि ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. त्या सदस्यांचे देखील आभार मानतो. अप्रत्यक्षपणे ज्या सदस्यांनी प्रचंड मतांनी पारीत केला त्यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असणारे आणि कर्मावर अढळ विश्वास असणारे असे व्यक्तिमत्तव एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोघांच्या प्रभावाने १९८० साली शिवसेनेत त्यांनी काम सुरु केले. शाखाप्रमुख इथून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. आनंद दिघेंनी ८४ मध्ये शिंदेंची किसनगर शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सातत्याने सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आंदोलन करायचे अनेक केसेस लागायच्या, जेल व्हायची बाहेर यायचे पुन्हा दिघेंच्या आदेशाने जनमानसात हजर आसायचे, गरजवंतांना धान्य, तेल उपलब्ध करुन द्यायचे असेल, अनेक गोष्टींसाठी आंदोलन करायचे आणि त्यातून लोकांना न्याय द्यायचा, अस फडणवीस म्हणाले.

२००० मध्ये कोपरी पाचपाखाडी असा मतदार संघ झाला. यानंतर सलग चार वेळा विधानसभेत पोहोचले. तर त्या काळात सीमा प्रश्नावर जे काही आंदोलन झाले त्या आंदोलनात एक प्रकारे त्यांनी नेता म्हणून दबदबा निर्माण केला. १९८६ साली आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आणि जवळ जवळ १०० वेगळे कार्यकर्ते होते. ४० दिवस बेलारीच्या जेलमध्ये सीमा प्रश्नी कारावास भोगला आणि त्यातून त्यांचे मोठं व्यक्तिमत्त्व तयार झाले. ९७ साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. आमदार झाले, जिल्हा प्रमुख झाले. ज्यानंतर २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हा अल्पशा काळासाठी ते विरोधी पक्षनेते होते त्यानंतर पुन्हा एकत्र आलो आणि एमआरडीसीचा कार्यकाळ त्यांनी स्वीकारला, काही लोकांना वाटायचे एमएसआरडीसी यांना दिली म्हणजे पंख छाटले. अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामातून शिंदेंनी आपली झलक दाखवून दिली 

समृद्धी महामार्ग या महामार्गाची संकल्पना मी मांडली आणि त्यांना घेऊन बसलो आणि सांगितले माझी इच्छा आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हे काम करु त्याचे प्लान तयार केले आणि ९ महिन्यांत जमीन मिळवली आणि जवळजवळ तो रस्ता पूर्ण होत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन ज्या व्यक्तीने समस्या सोडवल्या आणि काम सुरळीत होईल यावर लक्ष दिले. त्या  व्यक्तीचे नाव एकनाथ शिंदे आहे. त्यांनी आपल्या कामातून झलक दाखवून दिली. अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामांचे कौतुक केले.

मुंबई पुण्याचे अंतर कमी करणारा मिसिंग लिंक असेल त्यामुळे हे अंतर कमी होणार आहे. रेकॉर्ड तोडणारा ब्रीज तयार होत आहे. बांद्रा वर्सोवा सी लिंक असेल असे अनेक प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले. आणि त्यादरम्यान त्यांना आरोग्य खात्याची जबाबदारी मिळाली त्यामध्येल सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. सामान्य माणसापर्यंत आरोग्यसेवा पोहोचली आहे. आरोग्य विभाग मिळाल्यानंतर पायाला भिंगरी लावून स्वतः जाऊन त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था उभारली आहे. डॉक्टरांच्या नियुक्त्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे असे काम केले आहे, असही फडणवीस म्हणाले.

शिंदे वेगळं रसायन

शिंदे वेगळं रसायन आहे. त्यांना म्हणतो तुम्ही झोपता आणि जेवात कधी हे कळत नाही. २४ तास काम करणारा हा नेता आहे. निवडणुका असो काही असेल तर ७२ बाय २४ असे तीन दिवस काम करताना दिसतात. अनेक वेळा राजकारणात पद मिळाल्यावर माणुसकीचा भाव विसरतो. शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. मोठ्या आणि लहान माणसासाठी धावून जाण्याची शिकवण आनंद दिघे यांनी दिली आहे. ज्यांचा कोणी नाही त्यांचे दिघे साहेब होते आणि तीच शिकवण त्यांनी शिंदेंना दिली आहे. त्यामुळे ते धावून जाऊन काम करत असतात. अशा शब्दात त्यांनी शिंदे यांचे कौतुक केले.

आमची लाईन २४ तास सुरु राहणार आपत्ती व्यवस्थापन २४ तास करणार तेव्हा त्यांनी सांगितले, तुम्ही तर आहेच आम्ही सुद्धा २४ तास कामासाठी उपस्थित आहोत. नंदुरबारवरुन मोर्चा आला होता तेव्हा त्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली होती. नंतर गिरीश महाजन यांनी स्वतः जाऊन त्याची माहिती घेतली होती. आंदोलक आपले विरोधक आहेत असे माणून चालणार नाही. आंदोलक त्यांचा मुद्दा मांडतात, असही फडणवीस म्हणाले.

आमच्याविरोधात काही बोल्यास जेलमध्ये टाकू ही गोष्ट फार चांगली नाही. लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे. तो आवाज पटला नाही तरी ऐकला पाहिजे. त्यावर प्रत्युत्तर दिलं पाहिजे ते देण्यास काही हरकत नाही. शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांचे नाव आहे. त्यांना सांगितले की, तात्काळ जा, माझा वाढदिवस होता मी उद्धव ठाकरेंशी बोलतो तुम्ही जा तिकडे, बोटीमधून प्रवास करताना प्रवाशांना बाहेर काढले. ज्यावेळी अनेक प्रशासनाचे लोकं हिंमत करु शकत नव्हते अशा वेळी त्यांनी मदत केली, असही फडणवीस म्हणाले.


आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा दावणीला बांधलेले आमदार नाही, हितेंद्र ठाकूरांचे राऊतांना प्रत्युत्तर