Maharashtra Weather News मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहेत. दुपारी गरम आणि रात्री व पहाटे गारठा असं वातावरण सध्या राज्यात आहे. मात्र, अचानक वातावरणात सातत्याने होत असलेल्या या बदलांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, दिवसभरात बहुतांशवेळा गारठा लागत असल्याने राज्यात अजूनही थंडी कायम असल्याचे अनुभवायला मिळत आहे. (Maharashtra Weather News Update Cold Wave Temperature Increased In Mumbai)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत आहे. असं असलं तरी पुढील 24 तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे. तापमानातील चढ-उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तसेच, विदर्भात पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी 24 तासांनंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदलांचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारनंतर तापमानवाढीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उष्मा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई शहर, उपनगर, औरंगाबाद, पुणे इथं किमान तापमान 14 ते 17 अंशांदरम्यान असलं तरीही कमाल तापमानाचा आकडा सरासरी 34 अंशांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे.
पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळे राजस्थानासह मध्य भारतापर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत. याशिवाय, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, काश्मीर, हिमाचल प्रदेश येथील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : स्वत:कडे मुख्यमंत्रिपद न ठेवता बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं – संजय राऊत