Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रMaharashtra Weather : सातपुड्यात दवबिंदू गोठले, शेतावर पसरली बर्फाची चादर; काश्मीरचा फिल

Maharashtra Weather : सातपुड्यात दवबिंदू गोठले, शेतावर पसरली बर्फाची चादर; काश्मीरचा फिल

Subscribe

नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा तडाखा वाढू लागला आहे. अशामध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून आले. अशामध्ये राज्यातील नंदुरबारमध्ये तापमान हे 6 अंशापर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. सातपुड्यातील चौथ्या पर्वतरांगेत उंच पठारावर असलेल्या डाब, वालंबा परिसरात किमान तापमान हे अंदाजे 5 ते 6 अंशांवर गेले. दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले. तर, चारचाकी वाहनांच्या टपावर बर्फ जमा झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात जणू काश्मीरचा फील येथील नागरिकांनी घेतला. (Maharashtra Weather Satpura temperature to 6 degree Celsius)

हेही वाचा : Pune Municipal Corporation Elections : भाजपाचे पुढील लक्ष्य पुणे मनपा, निवडणुकीची तयारी केली सुरू 

डिसेंबर महिन्यात किमान तापमान 6 अंशांवर गेले. त्यामुळे मंगळवार (10 डिसेंबर) आणि बुधवारी (11 डिसेंबर) दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत दवबिंदू गोठलेल्या स्थितीत राहत असल्याने बर्फाची चादर पसरल्याचे चित्र गाव, पाड्यातील घरांचे छत, वाहनांचे टप, पिकांवर दिसून येते. त्यामुळे दिवसभर गारठा कायम राहत आहे. गेल्या काही वर्षापासुन या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथील कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र समोर आले.

गेल्या 48 तासांमध्ये नंदुरबारमधील सातपुडा परिसरात भागात तापमानात 8 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे समोर आले. अशामध्ये सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये समुद्र सपाटीपेक्षा तापमान 4 ते 5 अंशापर्यंत खाली आलेले आहे. राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये मंगळवारी (10 डिसेंबर) देशातील सर्वात कमी 4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान मोसमातील सर्वात निचांकी ठरली.

देशातही थंडीचा तडाखा

देशातही आता हळूहळू थंडीची लाट पसरत असल्याचे दिसून येत आहे. राजस्थानमधील सिकर येथे 1.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक भागांमध्ये तापमान 1.5 ते 10.8 अंश सेल्सिअस इतके होते. तर, काश्मीरमध्येही तापमानात मोठी घट झाली आहे. श्रीनगरमधील तापमान शून्य ते उणे 3 अंशापर्यंत पोहोचले आहे. उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्गमध्ये तापमान शून्य ते उणे 6 अंश एवढी नोंद झाली होती. तर, देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. बुधवारी (11 डिसेंबर) सर्वात कमी म्हणजे 4.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


Edited by Abhijeet Jadhav