घरमहाराष्ट्रMaharashtra Weather : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका; विदर्भासह मराठवाड्यात बळीराजा संकटात

Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका; विदर्भासह मराठवाड्यात बळीराजा संकटात

Subscribe

अमरावती : विदर्भात उत्तर मध्य महाराष्ट्रावर आद्रता वाढल्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. यंदाच्या वर्षी पावसाने उशिरा आगमन केल्यानंतर आता थंडीच्या दिवसातही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहेत. त्यामुळे संपूर्ण विदर्भात 12 बारा फेब्रुवारीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Unseasonal rain hits farmers again Baliraja in crisis in Marathwada along with Vidarbha)

हेही वाचा – Maharashtra Crime : गोळीबाराचे सत्र सुरूच; मुंबईनंतर आता पुण्यात फायरिंग 

- Advertisement -

विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपट्टीचा फटका बसला. धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धामणगाव तालुक्याला दुपारच्या सुमारास गारपीटीचा प्रचंड फटका बसला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

यवतमाळ आणि वर्षा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये गारपीट झाली. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. मात्र देवळी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. गारांच्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत. देवळी तालुक्यातील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला असून चणा, गहू, तूरीचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Wadettiwar Vs Bangar : संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला अन् वडेट्टीवारांचा संताप…

विदर्भासह मराठवाड्याला यलो अलर्ट

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  विदर्भात उत्तर मध्य महाराष्ट्रावर आद्रता वाढल्याने पुढील दोन ते चार दिवस विदर्भासह मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहून किमान तापमान हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच 12  फेब्रुवारीनंतर पुन्हा किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच  पुणे व आसपासच्या परिसरात रात्री उशिरा किंवा पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -