मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपर्यंत अवकाळी पाऊस आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. आगामी काहीकालात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उत्तर महाराष्ट्रात याचा परिणाम अधिक दिसून येत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवत हवामान खात्याने हे तापमान राज्यातील अनेक भागांमध्ये १० ते ११ अंश सेल्सिअसखाली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update cold has increased temperature in the state)
हेही वाचा : Maharashtra Politics : सभागृहात थोरातांची कमी सर्वांना जाणवेल; पराभवावर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे राज्यातील हवामानावर याचा फरक दिसून येणार आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळे राज्यामधील हवामानात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे तापमानामध्ये मोठी घटदेखील झाल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात दिवसाला तापमानात वाढ तर पहाटे तसेच रात्री तापमान कमी होण्याची शक्यता आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यातील तापमानामध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस जास्त फरक दिसणार नसला तरीही पुढील काही तासांमध्ये 2 ते 3 अंशाने तापमान घसरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास तापमानात घट झाल्यामुळे हवेत गारवा अधिक प्रमाणात जाणवत आहे. तसेच, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी झाला आहे. याठिकाणी थंडी वाढली असून अनेकांनी आपले स्वेटर बाहेर काढल्याचे चित्र दिसून आले.