IMD NEWS : देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. दक्षिणेकडील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोळसल्या असताना पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावानं अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे उत्तर भारतातील तापमानात बदल झाला आहे. राज्यातही तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कोरड्या आणि शुक्र वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे तापमान हळू-हळू घसरताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घसरणार आहे. त्यासह कमाल तापमानातही एक ते दोन अंशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाच्या झळा बसणार आहेत.
हेही वाचा : अभयसिंह, मोनालिसा अन् कुंभमेळा !
डिसेंबर महिन्यात नागरिकांना थंडीनं गारठून टाकलं होते. पण, 2025 सुरू झाल्यापासून वातावरण सातत्यानं बदलताना दिसत आहे. कधी ढगाळ-कधी थंडी, असं वातावरणात बदल झाले होते. आता पुन्हा थंडी जाणवू लागली आहे.
24 तासांत उत्तरेकडील राज्यांत 2 ते 3 अंशांनी तापमानात घट होणार आहे. तसेच, दक्षिणेकडील नैऋत्य मौसमी पावसाचं वातावरण येत्या दोन दिवसात कमी होईल. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागापासून राजस्थान ते गुजरातपर्यंत हवेचा दबाव राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 5 दिवसांत थंडीसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाच ते सहा दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होणार आहे.
हेही वाचा : काळ सोकावायला नको म्हणून….