ऐन होलिका दहनाच्यावेळी राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, भाविकांच्या उत्साहावर पाणी

राज्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आज धुलिवंदन असून, काल होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली.

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आज धुलिवंदन असून, काल होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरलं.

काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, विजांचा कडकडाटही सुरू होता. तसेच, ठाणे शहराच्या हवेत अनेक धुळीचे कण पसरलेले दिसून आले. शिवाय, कल्याण-डोंबिवली, भिवंडी अशा विविध शहरात आज पावसाने हजेरी लावली होती.

या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जळगावमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि धुळे जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला. त्यामुळए पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात जोरदार वादळी वारा झाल्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याशिवाय, धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने बुधवारी हजेरी लावली त्यानंतर गुरुवारी गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, एकीकडे संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा सुरू असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरले.


हेही वाचा – ‘एचएएल’ला मिळाले सहा हजार कोटींचे काम; एचटीटी ४० जातीची ७० विमाने बनवणार