राज्यात आज बहुतांश भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्याच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. चारही विभागांत कुठे हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. पुढील 23 तासांत याचे रुपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार असल्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra weather Update Warning of heavy rain in the state today Yellow alert for these districts )
मुंबईसह कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसर वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातदेखील आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली , बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला जिल्ह्यात आजपासून पुढील 16 तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात 14 ते 16 दरम्यान, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण गोव्यात 16 तारखेला, विदर्भात 14 ते 16 तारखेला तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात 14 ते 16 तारखेला मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर जरांगे पाटील आक्रमक )