Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra Mini Lockdown: वीकेंड लॉकडाऊन परिणामकारक नाही, केंद्राचा महाराष्ट्राला सल्ला

Maharashtra Mini Lockdown: वीकेंड लॉकडाऊन परिणामकारक नाही, केंद्राचा महाराष्ट्राला सल्ला

केंद्रीय गृहसचिवांची वीकेंड लॉकडाऊनवर टिपण्णी

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल (सोमवार) पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण या वीकेंड लॉकडाऊन केंद्र आणि राज्य सरकारचे वेगवेगळे मत असल्याचे समोर आले आहे. वीकेंड लॉकडाऊन परिणामकारक नाही, असा सल्ला केंद्राने राज्य सरकारला दिला आहे. काल (सोमवार) झालेल्या केंद्र गृहसचिवांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या वीकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे.

रविवारी राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रातल्या अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय आश्चर्यकारक वाटला. कारण दोन दिवसाआधी केंद्र स्तरावरती सर्व राज्य सचिवांची बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्राने वीकेंड लॉकडाऊनबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन ठिक होता, परंतु आताची परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर हा उपाय फारसा परिणामकारक ठरणार नाही. वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम हा मर्यादित स्वरुपाचा असतो. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा तुर्तास फायदा होणार नाही, असे केंद्रीय गृहसचिवांच्या बैठकीत मत व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा विस्फोट : संसर्ग रोखण्यास केंद्राकडून महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला ५० आरोग्य पथके रवाना

१५ मार्च रोजी जी बैठक झाली होती, त्यामध्ये कंटेन्मेट झोनच्या येथे अधिक कडक निर्बंध करण्यात यावे. हा यावरचा उपाय होऊ शकतो, असे केंद्र स्तरावरून सांगण्यात आले होते. पण तरीदेखील महाराष्ट्राने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. याची कल्पना केंद्र सरकारला नव्हती. पण आता वीकेंड लॉकडाऊमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे वेगवेगळी मत पुढे आली आहेत. स्थानिक स्तरावर काय करायचे आहे, हे राज्य सरकार ठरवू शकते.

- Advertisement -

दरम्यान आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून कोणत्या नवीन प्रस्ताव येतोय? हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती


 

- Advertisement -