घरमहाराष्ट्रविकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?; राज्य सरकारने दिली माहिती

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?; राज्य सरकारने दिली माहिती

Subscribe

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दी चैन या नव्या धोरणानुसार राज्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तसंच विकेंड लॉकडाऊन देखील लावण्याचा निर्णय घेण्यात आहे. शुक्रावारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार आहे, याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत नियमावली जारी केली आहे. कोणतंही दुकान अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते दुकान बंद करण्यात येईल. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही. तसंच, विकेंड लॉकडाऊनमध्ये एपीएमसी मार्केट सुरु राहणार आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला नियमांचं उल्लंघन होत आहे, असं वाटलं तर ते राज्य सरकारकडून परवानगी घेऊन मार्केट बंद करु शकतात.

- Advertisement -

बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु राहणार नाहीत. तसंच, गॅरेज सुरु राहणार आहेत. गॅरेज ही वाहतूकदारांची गरज आहे. मात्र, ऑटोमोबाईल पार्ट दुकानं बंद राहणार. गॅरेज दुकानदार कोविड नियमांचं पालन करतंय का? हे स्थानिक प्रशासन पाहणार आहे. अत्यावश्यक सेवेत कोण कोण येतात याची देखील माहिती राज्य सरकारने दिली आहे. केंद्र सरकार, पब्लिक सेक्टर अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. मात्र, काही केंद्रीय कर्मचारी हे अत्यावश्यक शासकीय सेवेचा भाग असेल, तर त्यांना त्यात मोडलं जाईल.

जिथे जिथे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या, तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करू शकतात. १० एप्रिलपासून अंमलबजावणी सुरु होणार. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.

१. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का?

४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.

२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद?

ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

३. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय?

कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का?

बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का?

वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का?

नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का?

हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का?

नाही.

९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का?

हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

नाही.

११. दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील?

नाही.

१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?

हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -