मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळणार : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावरून राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यासाठी विरोधीपक्ष भाजपाने आंदोलनही केले होते. शिवाय, भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) हल्लाबोलही केला होता.

Approval for distribution of surplus pulses under Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक डाळींच्या वाटपाला मंजूरी

ओबीसी आरक्षणावरून राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यासाठी विरोधीपक्ष भाजपाने आंदोलनही केले होते. शिवाय, भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) हल्लाबोलही केला होता. त्यानंतर आता राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाबाबत माहिती दिली. “निवडणूक आयोग आपलं काम करत असल्याची कल्पना आहे. अजून निवडणूक आयोगाचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड महिन्याची प्रक्रिया असून हा पावसाचा हंगाम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण जाणार आहे अशी विनंती केली आहे. दुसरीकडे बांठिया आयोगही अतिशय चांगलं काम करत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.”, असे म्हटले

“सरकारच्यावतीने मुख्य सचिव व इतरही मंडळी अभिप्रेत असलेला डाटा गावागावातून गोळा करत आहे. मध्यप्रदेशने जे गोळा केले तसेच त्यांनी करावं आणि अधिक चांगलं करता येईल ते करावं. पंधरा-वीस दिवसात आयोगाचं काम संपावं अशी अपेक्षा आहे. ते काम संपल्यावर आपल्यालासुध्दा सुप्रीम कोर्टाकडे आमचं आरक्षण मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत.त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नाही”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

‘निवृत्त सचिव असतील किंवा मुख्य सचिव असतील त्यांच्यात विचारांचं घर्षण होत असतंच. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हवी ती माहिती देत आहोत. सरकार पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे चर्चा करणं म्हणजे फार मोठे मतभेद होणं असं नाही. चर्चा करत असतील. आमच्यात समन्वय आहे. ओबीसीचा डाटा हवा आहे बाकीचा कुणाचा डाटा आवश्यक नाही’, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आमचा हक्काचा जीएसटी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीवर ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी ‘जीएसटीचा परतावा सगळाच द्या ना, तुम्हाला दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार रखडला आणि एक महिन्याचा दिला तर दोन महिन्याचा पगार देणार नाही का, आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या. सगळा आमचा जो जीएसटी आहे जो हक्क आहे जो काही वीस – पंचवीस हजार कोटी रुपये गोळा करता तो आम्हाला देऊन टाका ठेवता कशाला,’ असा सवाल छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला.

सध्या राज्यात हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहे. याबाबत भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भुजबळ यांनी पत्रकार परिषदेसाठी समोर ठेवण्यात आलेला बूम उचलून पत्रकारावर हात उगारण्याचा अभिनय केला व हनुमान जन्मस्थळाबाबत तुमच्या मनात काही शंका आहे का, असा सवाल केला.


हेही वाचा – National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स, ८ जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश