घर महाराष्ट्र महाराष्ट्राला अजित पवार रिर्टन्स पार्ट-2 पहायला मिळेल, काँग्रेसचा दावा

महाराष्ट्राला अजित पवार रिर्टन्स पार्ट-2 पहायला मिळेल, काँग्रेसचा दावा

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-2 पाहायला मिळू शकतो, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

- Advertisement -

सत्तेत सहभागी असलेले अजित पवार आणि इतर नेते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा देशपातळीवर होतो तेव्हा! अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय आहे, असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा, म्हणाल्या – “भाजपचे कौतुक यासाठी…”

- Advertisement -

शरद पवार यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही, ‘इंडिया’ आघाडी बरोबरच राहणार आहे, असे शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेले त्यांचे सहकारी हे शरद पवार यांच्या पाया पडतात म्हणजे, भाजपाने जी राजकीय घाण केली आहे त्याचे उत्तर अजित पवार रिटर्न्सने मिळू शकते, असा याचा अर्थ आहे, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – …हा तर राष्ट्रवादीचा मोठा गेम, पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडूंचा प्रहार

भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. भाजपाने आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले व कटकारस्थान करून एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही तेच केले; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्षम व राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. अजित पवार यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. शरद पवार यांचे राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाला ते कात्रजचा घाट दाखवतील, असा विश्वासही अतुल लोंढे यांनी दाखवला.

- Advertisment -