घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, नितेश राणेंचा पलटवार

महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, नितेश राणेंचा पलटवार

Subscribe

महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही हेही भविष्यात सगळ्या लोकांना कळेल. राहुल कनालचे सीडीआर रिपोर्ट तपासले पाहिजेत, त्याच्या कंपनीतून कोणाकोणाला पैसा गेला हे पाहिलं पाहिजे. याचीही चौकशी झाली पाहिजे, असं माझं मत आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.

मुंबईः मुंबईत शिवसेनेचे नेते राहुल कनाल, बजरंग खरमाटे, संजय कदम यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केलीय, त्यानंतर वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या कारवाईला दिल्लीचं आक्रमण म्हटलं. त्यालाच आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. आज सकाळी मुंबईच्या विविध ठिकाणी ज्या आयटीच्या रेड झाल्या. शेवटी तो त्यांच्या तपासाचा भाग आहे. पण जो राहुल कनाल नावाचा हा जो व्यक्ती आहे, ज्याचे वडील दाताचे डॉक्टर आहेत. डेन्टिस्ट आहेत. मग त्यांच्या घरी रेड का टाकण्यात आली. राहुल कनाल भाईजान नावाचं एक हुक्का पार्लर चालवतो. मुंबईत एकाच जागी हुक्का पार्लर चालतो, तोसुद्धा हर्बल हुक्का पार्लर आहे, तो राहुल कनालचा आहे, असा आरोपही नितेश राणेंनी केलाय.

- Advertisement -

मुंबईत चालणाऱ्या नाईटलाईफ गँगचा हा एक सदस्य

कॅफे बांद्रा नावाचं एक रेस्टॉरंट तो बांद्रामध्ये चालवतो. तिकडे सगळं अनियमित पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. कोविड सेंटरसंदर्भात किंवा अन्य विविध जे टेंडर निघाले, त्याच्या मध्येही याचा कुठे ना कुठे हस्तक्षेप आहे. याहीबद्दल खूप लोकांना संशय आहे. मुंबईत चालणाऱ्या नाईटलाईफ गँगचा हा एक सदस्य आहे. राहुल कनालवर रेड का पडली, तो कोणाचा निकटवर्तीय आहे. संध्याकाळी 7 नंतर तो कोणासोबत उठतो, बसतो. कोणाच्या नाईटलाईफ गँगचा सदस्य आहे. त्याच्यावर एवढी कृपादृष्टी का आहे. त्याला थेट शिर्डी संस्थानवर ट्रस्टी म्हणून पाठवलं, असंही नितेश राणेंनी सांगितलंय.

नेमका राहुल कनालकडे एवढा पैसा आला कुठून?

ज्या 12 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवली, त्या 12 आमदारांमध्ये राहुल कनालचंही नाव सुचवलं गेलं होतं. नेमका राहुल कनालकडे एवढा पैसा आला कुठून, राहुल कनालकडे नेमका कोणाचा पैसा आहे. याचा तपास व्यवस्थित पद्धतीनं झाला पाहिजे. महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही हेही भविष्यात सगळ्या लोकांना कळेल. राहुल कनालचे सीडीआर रिपोर्ट तपासले पाहिजेत, त्याच्या कंपनीतून कोणाकोणाला पैसा गेला हे पाहिलं पाहिजे. याचीही चौकशी झाली पाहिजे, असं माझं मत आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.

- Advertisement -

महाराष्ट्र एवढा मोठा शब्द काढण्यासाठी फार ताकद लागले

दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूतच्या ज्या काही घटना झाल्या, त्या घटनेत राहुल कनालचा तर हात नाही ना, याबद्दल सीडीआर रिपोर्टचा तपास केला तर आपल्याला कुठे ना कुठे तरी पोहोचण्यास मदत होईल, असं माझं म्हणणं आहे. म्हणून केंद्रीय यंत्रणेनं त्याचा तपास करावा, अशी मी तिथे मागणी केलेली आहे. 8 तारीख रात्रीला तो कुठे होता, 13 तारीख रात्रीला तो कुठे होता. कोणाबरोबर होता, याची टॉवर लोकेशनवरून माहिती घेऊन थोडा अंदाज घेतला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे, असंही नितेश राणे म्हणालेत. आदित्य ठाकरे नाईटलाईफ गँग, पेंग्विन गँग आम्ही समजू शकतो. महाराष्ट्र एवढा मोठा शब्द काढण्यासाठी फार ताकद लागले. महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही. राहुल कनाल हा सिंधी समाजाचा आहे, तो मराठी कुठून आला. मग मराठी माणसाला श्रीमंत करायचं होतं ना. महापालिकेचे टेंडर असो, बीएमसीचे टेंडर असो, कनाल, मौर्या या नावाच्या लोकांना कसे भेटत होते, असा सवालही भाजपचे आमदार नितेश राणेंनी उपस्थित केलाय.


हेही वाचाः IT Raid : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालांबरोबर संजय कदम, खरमाटेंच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -