घरमहाराष्ट्रअलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती फेटाळल्यास कर्नाटकविरोधात कोर्टात जाणार, फडणवीसांचा इशारा

अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती फेटाळल्यास कर्नाटकविरोधात कोर्टात जाणार, फडणवीसांचा इशारा

Subscribe

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कर्नाटकने सीमेवरील अलमट्टी धरणात अचानक पाणी पुरवठा वाढवत महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता अलमट्टी धरणावरूनही वाद रंगतोय. आता कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यचे काम सुरु केले आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी आज विधानसभेत करण्यात आली. ज्यावर अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती कर्नाटक सरकारला करू परंतु ही विनंती फेटाळल्यास कर्नाटक विरोधात न्यायालयात जाणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरने वाढल्यास महाराष्ट्रावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कर्नाटक हे पटवून दे, याचा अभ्यास करण्यासाठी सिमुलेशन मॉडेल तयार करण्याचे निर्देश दिले आहे, हे मॉडेल तयार झाल्यानंतर आपण इंच आणि इंच पाण्याचा हिशेब आणि काय परिणाम होऊ शकतो हे सांगू शकतो. त्यामुळे आमचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती करु असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी चर्चेतील उत्तरात दिले.

- Advertisement -

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे काम थांबवण्यात यावे अशी विनंती कर्नाटक सरकारला करणार असून ते न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारला तसे निर्देश देण्याची विनंती केली जाईल असंही फडणवीस म्हणाले.

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणावर अतिरिक्त 26 दरवाजे बसवण्यासाठी निविदा काढली आहे. याशिवाय अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात महापूराचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने उंची वाढविण्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांची समिती नेमली होती. या समितीने मेमध्ये एक अहवाल दिला होता. त्या अहवालात अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रावर परिणाम होईल याबाबत सुचित केले होते. 9 सप्टेंबर 2021 रोजी वडनेरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हा अहवाल दिला. त्यात अभ्यास करत असताना कर्नाटकने पलीकडे बंधारे बांधले नव्हते. मात्र कर्नाटकने आता बंधारे बांधल्यामुळे पुराचा धोका उद्धवू शकतो असे सांगितले. तसे पत्र मलाही दिले आहे. त्यामुळे आता बंधाऱ्यासह काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले.


खनिज धोरणाची लवकरचं घोषणा करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -