घरदेश-विदेशनक्षलवादाला घाबरून गडचिरोलीत औद्योगिक विकास थांबणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीत औद्योगिक विकास थांबणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Subscribe

मुंबई : नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisement -

आत्राम यांना नक्षलवाद्यांची धमकी

दरम्यान विधानसभेत आत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट नक्षवाद्यांची धमकी येत असल्याची माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, सूरजागड लोहखनीज प्रकल्पामुळे प्रशासनात तणाव निर्माण झाला आहे. नक्षल्यांची धमकी लक्षात घेता, आत्राम यांची सुरक्षा वाढवावी, प्रशासनाची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्राम यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल शासनाने घेतली असून त्यांना आवश्यक सुरक्षा दिली जाईल असे आश्वासन दिले. याच मुद्द्यावर दिलीप वळसे पाटील यांनीही विधिमंडळात भाष्य केलं. सूरजागड प्रकल्प बंद पाडण्यासाठी नक्षल्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तिथे बेरोजगारांना मिळालेला रोजगार हिरावल्या जाणार नाही याबद्दल आश्वस्त करावे, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

यावर जूनपर्यत सुरजागडचा पहिला टप्पा सुरू होणार असून अजून २० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सुरूवातीला असलेला लोकांचा विरोधही आता मावळत चालला आहे. यातील सर्व अडथळे दूर करण्याचे प्रयत्न आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

दरम्यान या मुद्द्य़ावर आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे म्हटले आहे. रस्त्यांमुळे अनेकांचे जीव गेले, झाडे तोडली गेली. सूरजागड प्रकल्पामुळे नक्षल्यांना ताकद मिळत आहे. या प्रकरणाला सहजतेने घेऊ नका. यावर उच्चस्तरीय बैठक लावावी, अशी मागणी पटोले यांनी केली. ज्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही, असे म्हणत नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीचे तरुण नाहीत. त्यांना छत्तीसगढमधून भरती करावी लागत आहे. स्थानिकांना रोजगार मिळत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.


नॅनो मोर्चावर राऊतांकडूनच शिक्कामोर्तब; फडणवीसांचा टोलेबाजी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -