घरताज्या घडामोडीबाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Subscribe

नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील सर्व आमदार नागपूर विधानभवनात दाखल होत आहेत. अशातच आज सकाळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या विधानभवनात दाखल झाल्या.

नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील सर्व आमदार नागपूर विधानभवनात दाखल होत आहेत. अशातच आज सकाळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या विधानभवनात दाखल झाल्या. विशेष म्हणजे आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन नागपूर विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. (Maharashtra Winter Session 2022 Nashik MLA Saroj ahire reached Vidhan Bhavan with her baby)

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या आपल्या बाळाला घेऊन नागपूर विधान भवनात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी एक आई असली तरी त्याबरोबर आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले. शिवाय, माझे कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडीन. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक सोडवण्यावर भर राहणार आहे”, असे सरोज अहिरे यांनी सांगितले.

- Advertisement -

आमदार सरोज अहिरे-वाघ यांच्या बाळाचा ३० सप्टेंबरला जन्म झाला. त्यामुळे हे बाळ अवघे अडीच महिन्यांचे असून आमदार सरोज अहिरे यांचेही पहिलेच अधिवेशन असल्यामुळे त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.


हेही वाचा – ‘या’ मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -