घरमहाराष्ट्रमहापुरुषांचा अपमान; फडणवीस राऊत आणि अंधारेंवर बरसले, वाचला मविआ नेत्यांच्या वक्तव्याचा पाढा

महापुरुषांचा अपमान; फडणवीस राऊत आणि अंधारेंवर बरसले, वाचला मविआ नेत्यांच्या वक्तव्याचा पाढा

Subscribe

महाराष्ट्रात सातत्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. हा मुद्दा आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजला. ज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना महापुरुषांचा अपमान थांबवण्यासाठी कडक कायदा आणण्याची मागणी केली. ज्यावरून विधानपरिषदेत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे दिसले, दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचं विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. मविआ सरकारमधील आमदार शशिकांत शिंदे, अनिल परब यांनी यावर भाष्य करत शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र फडणवीसांना तो प्रयत्न हाणून पाडत मविआ सरकारमधील एकएका मंत्र्याने कशाप्रकारे महापुरुषांचा अपमान केला याचा जणू पाढाच वाचून दाखवला.

यावर फडणवीस भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी महापुरुषांचा अपमान होऊन नये, अनिल परब यांच्या एका वाक्याशी सहमत सहमत आहे. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ह वासरु मारला पाहिजे असा एक वाकप्रचार आहे, असे घडता कामा नये. ज्या घटना घडल्या त्याला पार्श्वभूमी आहे. त्याबद्दच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

- Advertisement -

विरोधक स्वत:ला छत्रपती समजून बोलतात का? 

विरोधकांनी महापुरुषांचा अपमान होणार नाही असे विधेयक आणवं अशी मागणी केली त्याप्रमाणे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही मला भेटून ही मागणी केली, सं पत्र देखील दिलं आहे. मात्र उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे म्हणून पुरावा मागणारे लोकही आपल्याकडे आहेत. हा छत्रपती घराण्याचा अपमान नाही का? आज असं म्हणतो की, हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा, म्हणजे तुम्ही स्वत:ला छत्रपती समजता का? तुम्ही छत्रपती समजून त्याप्रकारे बोलता, असा थेट सवालही विरोधकांना विचारला आहे.

यावेळी अनिल परबांकडे हात करत फडणवीस म्हणाले की, तुमच्या पक्षातील एका नेत्या म्हणाल्या की, संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजाऊंचे रुप आहे, आणि त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आत्ता आपण कोणाशी तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात कोणत्याच मातेचा अपमान नाही, तर ही तुलना होऊ शकते का? असा सवालही फडणवीसांना केला.

- Advertisement -

शरद पवारांची विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का?

मिटकरी देखील चांगल्या हेतूने बोलले असतील की, शरद पवार पवार आमचा विठ्ठल आहे. पवारसाहेब मोठे नेते असतील पण त्यांची विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का? कोणाचीच होऊ शकत नाही. सुषमा अंधारे यांनी रेड्याबाबत केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला का? वारकरी संप्रदायाने जातविरहीत वारकरी समाज उभा केला, संतांनाही समाजात विभाजित केलं जात त्यावर कोणी काही बोलत नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.

आदित्य ठाकरे- तेजस्वी यादव भेटीवर फडणवीसांचा हल्लाबोल 

रयतेचा राजा शिवबा माझा, अशा लाईनखाली राहुल कलाल यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोवर आदित्य ठाकरे यांचा फोटो लावून ग्राफिक तयार केलं. अनिल गोटे काय म्हणतात की, महाराण्या पायरीच्या पन्नास आहेत अहो राजमाता ऊसाच्या मळ्यात फुटा फुटावर आहेत. पण माऊलीबद्दल असाप्रकारे बोललं जात तर तो कोणाचा अपमान आहे, असा संतप्त सवालही फडणवीसांनी मविआ सरकारला विचारला आहे. यावेळी  लालू प्रसाद यादव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले होते? असा सवाल करत  शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरही फडणवीसांनी जहरी टीका केली.

सामानातून राऊत छत्रपती शिवाजी महाराज उल्लेख शिवाजी करतात

राहुल गांधी स्वत;ला माफीवीर म्हणतात आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, त्यावर कोणी बोलत नाही. सावरकरांचा भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण त्यांचा अपमान थांबवा. सामानातून संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज नाही तर शिवाजी म्हणतात, अशा शब्दात फडणवीसांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी फडणवीसांना सामना वृत्तपत्रातील काही कात्रणही दाखवली आहेत. यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणावा

छत्रपती शिवाजी महाराजा आणि इतर युग पुरूषांपेक्षा कोणीही मोठा नाही. उत्तर प्रदेशमध्ये युगपुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणला. आपणही असा कायदा आणाला पाहजे. हा कायदा आपल्याकडे आणला तर महापुरूषांबाबत बोलतना प्रत्येकजण विचार करतील. मंत्री मंडळात नंबर लावण्यासाठी काही जण अशी वक्तव्य करत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मान कापली तरी चालेल पण महारांचा अवमान सहन करणार नाही असे म्हणतात. मात्र, महाराष्ट्रात अवमानाची मलिकाच सुरू आहे, त्यामुळे याबाबत कायदा आणावा अशी मागणी अनिल परब यांनी केली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती पाइपद्वारे गॅस पुरवठा, कुडाळमधील राजन बोभाटे ठरले पहिले मानकरी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -