घरमहाराष्ट्रनागपूरMaharashtra Winter Session : विरोधक 'या' मुद्द्यांवरून सरकारला घेरणार; 100 हून...

Maharashtra Winter Session : विरोधक ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरणार; 100 हून अधिक मोर्चे धडकणार

Subscribe

राज्य सरकार विधिमंडळाच्या अधिवेशनात 9 विधेयक मांडण्यात येणार आहे. यात मराठा आरक्षण आणि अवकाळी पाऊसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हे दोन मुद्दे अधिवेशनाच्या केंद्रस्थान असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरातून सुरुवात होणार आहे. यंदा राज्याचे हिवाळी अधिवेशन 10 दिवस असणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर खंडजगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकार विधिमंडळाच्या अधिवेशनात 9 विधेयक मांडण्यात येणार आहे. यात मराठा आरक्षण आणि अवकाळी पाऊसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हे दोन मुद्दे अधिवेशनाच्या केंद्रस्थान असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तसेच अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करते का? आणि मराठा आरक्षणासाठी सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या ड्रग्ज कारवाया, कारखाने आणि आरोग्य विभागातील कथित भ्रष्टचाराचे आरोप या मुद्यांवरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात. विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधक हे सरकारला धारेवर धरण्यासाठी अनेक मोर्चे काढतात. यंदाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी 48 मोर्चे निघणार असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत आहे.

- Advertisement -

नाना पटोले आणि रोहित पवारांचा मोर्चा

काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूरमच्या रस्त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारी आदी मुद्यावर 11 डिसेंबरला होणार आहे. जुनी पेन्शनला घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची संघर्ष यात्रा देखील नागपूरात येणार आहे. यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशना सत्ताधाऱ्यांना मोर्चांचा सामना कारवा लागणार आहे.

नागपुरात मोर्चांची संख्या 100 वर

नागपूरमध्ये 48 मोर्चे निघणार आहे तर 70 मोर्चे हे परवानगईच्या प्रक्रियेत अल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर 11 हजार पोलीस तैन्यात करण्यात आले आहे. यावेळी नागपुरात मोर्चांची संख्या ही 100च्या वर जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -