घरमहाराष्ट्रराहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात येताच वाजणार 'हे' गाणं; कार्यकर्ते सज्ज

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात येताच वाजणार ‘हे’ गाणं; कार्यकर्ते सज्ज

Subscribe

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा अशा चार राज्यांनंतर आता काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' येत्या 7 नोव्हेंबरला देगलूरमध्ये दाखल होणार आहे

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. (bharat jodo yatra in maharashtra) यापार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रा’ खास करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता आपल्यापरिने प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या यात्रेच्या स्वागतासाठी आणि यात्रेबाबत प्रचार, प्रसार करण्यासाठी युवक काँग्रेसने खास मराठीतून एक नवं गाणं रिलीज केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (maharashtra youth congress released marathi song for rahul gandhis bharat jodo yatra in maharashtra)

युवक काँग्रेसने रिलीज केलेल्या ‘भारत जोडू’ या मराठी गाण्याच्या सुरुवातीला रायगडासह अनेक किल्ल्यांचे व्हिज्यूअल्स दाखवण्यात आले आहेत. यासोबत राहुल गांधींच्या पदयात्रेतील गर्दी, त्या गर्दीतील कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडूया, मराठी मातीचा अभिमान असू द्या, भारत जोडू या अशा आशयाचं हे नवं गाणं रिलीज केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रिलीज केलेलं हे गाणं युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय हँडलवरून शेअर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधींच्या यात्रेचे वेळापत्रक

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा अशा चार राज्यांनंतर आता काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ येत्या 7 नोव्हेंबरला देगलूरमध्ये दाखल होणार आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव, लोहा, कंधार, भोकर आणि हदगांव तालुक्यातून हिंगोलीमध्ये प्रवेश करेल, यानंतर कळमनुरी, हिंगोलीमार्गे ही यात्रा वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये पोहचेल. यानंतर अकोल्यातील बाळापूरमार्गे बुलढाण्यातील खामगावंसह जामोद आणि जळगांवमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करेल. अशाप्रकारे राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रे’चे नियोजन आहे. यावेळी महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते रस्त्यावरून उतरून त्यांच्या यात्रेला समर्थन देण्याची शक्यता आहे.


फक्त वंदे भारतच नाही, आतापर्यंत ४ हजार ट्रेनना धडकली जनावर; दिवसाला होतात सरासरी २२ अपघात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -