Maharashtra ZP Panchayat Samiti By-Elections Results 2021 LIVE : सर्व जिल्हा परिषदांचा निकाल आला, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मारली बाजी

Maharashtra ZP Panchayat Samiti By-Elections Results 2021 LIVE
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, गुलाल कुणाचा? राज्याचं लक्ष

सर्व जिल्हा परिषदांचा निकाल आला, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मारली बाजी

पालघरमध्ये १५ जागांपैकी – ४ भाजपला, सीपीआय (एम) – १, राष्ट्रवादीला ४, शिवसेना ५, अपक्ष १

धुळे १५ जागा – भाजप ८, काँग्रेस २, राष्ट्रवादी ३, शिवसेना २,

नंदूरबार ११ जागा – भाजप ४, काँग्रेस ३, राष्ट्रवादी १, शिवसेना ३

अकोला १४ जागा – भाजप १, काँग्रेस १, राष्ट्रवादी २, शिवसेना १, वंचित ६, अपक्ष २

वाशिम १४ जागा – भाजप २, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ३, शिवसेना १,

नागपूर १६ जागा – भाजप ३, काँग्रेस ९, राष्ट्रवादी २

ZP Election Result


वसई पंचायत समितीत सत्तापरिवर्तन, शिवसेनेची सत्ता गेली, बहुजन विकास आघाडीची सत्ता

पक्षीय बलाबल
बविआ – ०५,
भाजप – ०२,
शिवसेना – ०१

पालघर – पालघर जिल्हा परिषद निवडणूक . आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ७ जागांचे निकाल हाती .
शिवसेना – २
भाजप – २
राष्ट्रवादी – २
माकपा – १


खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित पराभूत

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.

कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे.

भाजपच्या पंकज कोरे यांनी विजय मिळवला आहे.


माजी मंत्री, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील सर्व सहा गणात भाजपा उमेदवार विजयी


शिंदेखेडा : भाजप आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मालपुर गटातुन महावीर रावल व खलाणे गटातुन पंकज कदम विजयी. नरडाणा गटातुन संजीवनी सिसोदे विजयी, दाऊळ गणातुन भारत ईशी विजयी


साक्री पंचायत समिती(धुळे)

साक्री तालुक्यातील तीन गणातून शिवसेनेचे उमेदवार विजयी

बळसाणे गणातून महावीर जैन विजयी,
कासारे गणातून माधुरी चंद्रकांत देसले विजयी,

म्हसदी गणातून अर्चना राजधर देसले विजयी


धुळे जिल्हा परिषदेच्या १५ पैकी ८ जागांचे निकाल जाहीर

भाजप- ५
राष्ट्रवादी -२
शिवसेना – १


राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नागपूर जि. प. मध्ये भाजपचा आमदार विजयी झाला आहे. मिनाक्षी सरोदे २४०० मतांनी विजयी झाल्या आहेत.


मंत्री के सी पाडवी यांची बहीण गीता पाडवी खापर गटातून विजयी

खापर जिल्हा परिषद – राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहीण गीता पाडवी विजयी झाल्या आहेत.


धुळे जिल्हा परिषद – चंद्रकांत पाटलांची मुलगी धरती देवरे यांचा दिमाखात विजय

त्या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत.

धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.


नंदुरबार जि.प. पोटनिवडणुकीत भाजपच्या सुप्रिया गावित १३२६ मतांनी विजयी

सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या भगिनी


पालघर जिल्हा परिषद पहिला निकाल जाहीर, सावरे एमबुरे गटातून शिवसेनेच्या विनया विकास पाटील विजयी

अकोल्यात दहीहंडा जि प सर्कलमधून शिवसेनेचे गजानन वानखडे विजयी,

अकोला हिवरखेड पंचायत समितीत वंचितचे उमेदवार विजयी, तर लाखपूरी सर्कलमधून अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे आघाडीवर, डोंगरदिवे हे वंचितचे बंडखोर आहेत.


ज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या ८५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर गुलाल कुणाचा याची उत्सुकता सर्वांना आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांचा निकाल?

 • धुळे – १५
 • नंदूरबार – ११
 • अकोला – १४
 • वाशिम -१४
 • नागपूर -१६
 • पालघर-15

कोणत्या पंचायत समितीच्या किती जागांचा निकाल?

 • धुळे – ३०
 •  नंदूरबार – १४
 • अकोला – २८
 • वाशिम – २७
 • नागपूर – ३१
 • पालघर – १४