घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासाजनक! राज्यात २४ तासात नवीन रूग्ण घटले, तर ५४,५३५...

Maharashtra Corona Update: दिलासाजनक! राज्यात २४ तासात नवीन रूग्ण घटले, तर ५४,५३५ रुग्णांना डिस्चार्ज

Subscribe

राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. राज्यात आज ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख ५४ हजार ७३१ इतकी झाली आहे. परंतु आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ३३ हजार २९४ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज होम क्वारंटाईन रुग्णसंख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले.

आज नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८१ मृत्यू, ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६८३१८५

६३०९००

१४०४०

१९०७

३६३३८

ठाणे

५४४४९३

५०५९६५

७५७५

३१

३०९२२

पालघर

१०५५१५

८९४५५

१२९४

१२

१४७५४

रायगड

१३६३८९

१२५२१९

२३८४

८७८४

रत्नागिरी

३३२२६

२१९६२

६४३

१०६१९

सिंधुदुर्ग

१८८६६

१३८८३

४५०

४५२९

पुणे

९५६९३८

८४५४६७

१०२३२

५८

१०११८१

सातारा

१३०६०६

१०४४०२

२५४५

१२

२३६४७

सांगली

१०१२५९

७८९५७

२३२९

१९९७१

१०

कोल्हापूर

८५९७९

६४०१७

२०४७

१९९१२

११

सोलापूर

१३३४४३

१०९०५०

३१००

६०

२१२३३

१२

नाशिक

३६०५७३

३४०००९

३९४६

१६६१७

१३

अहमदनगर

२१४९५७

१८३७०४

२३९०

२८८६२

१४

जळगाव

१३००८०

११६९९७

२१४०

३२

१०९११

१५

नंदूरबार

३७४९२

३४३६६

७०४

२४२०

१६

धुळे

४१५३३

३७६७९

४९४

१२

३३४८

१७

औरंगाबाद

१३७४८७

१२६४३८

२१९६

१४

८८३९

१८

जालना

५२५४९

४४८५१

८१६

६८८१

१९

बीड

७२३९३

५२५८५

१३००

१८४९९

२०

लातूर

८३५४८

७२४०२

१४३०

९७१२

२१

परभणी

४५५७९

३८३०९

७४६

११

६५१३

२२

हिंगोली

१६०४८

१४१२८

२४१

१६७९

२३

नांदेड

८७३०२

८०५०६

१९२०

४८६८

२४

उस्मानाबाद

४७९८७

४०२४०

११४५

४९

६५५३

२५

अमरावती

७५६२६

६३५६२

११२५

१०९३७

२६

अकोला

४७७३३

४१६१४

७४८

५३६७

२७

वाशिम

३३२६०

२८९२४

४२०

३९१३

२८

बुलढाणा

६६१६०

५८९४१

४२७

६७८७

२९

यवतमाळ

६३०८४

५५६२१

११७०

६२८९

३०

नागपूर

४७४०३८

४२२१६४

५८३२

४६

४५९९६

३१

वर्धा

५२३९६

४४२२८

७०८

८३

७३७७

३२

भंडारा

५७२०३

५१६७२

५९०

४९३४

३३

गोंदिया

३८३१३

३३५०७

३९६

४४०४

३४

चंद्रपूर

७८५६७

६१२४८

९५०

१६३६७

३५

गडचिरोली

२५३३९

२१७५९

२६६

३३०५

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५२६९२९२

४६५४७३१

७८८५७

२४१०

५३३२९४


corona : संसर्गानंतर किती दिवसांनी दिसतात कोरोनाची गंभीर लक्षणे? जाणून घ्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -