घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राची लेक आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर करणार राष्ट्रपती निवडणुकीचं निरीक्षण

महाराष्ट्राची लेक आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर करणार राष्ट्रपती निवडणुकीचं निरीक्षण

Subscribe

आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षांसाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच दीपाली मासीरकर यांनी यापूर्वी मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर काम केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील २००८ च्या नागालँड बॅचच्या आयपीएस अधिकारी दीपाली रविचंद्र मासीरकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरता संचालक म्हणून दिल्ली येथे नेमणूक केलेली आहे. सोमवारी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीचे निरीक्षण आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर या करणार आहेत. दीपाली मासीरकर यांची नेमणूकीची बातमी कळताच चंद्रपूर जिल्ह्याची तसेच महाराष्ट्राची देखील मान अभिमानाने उंचावली आहे. सोमवारी म्हणजेच आज देशात राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे.

आज देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. भाजपने दौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी महाराष्ट्राची लेक आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर या राष्ट्रपती निवडणुकीचे निरीक्षक म्हणून उपस्थित असतील.

- Advertisement -

आयपीएस अधिकारी दीपाली मासीरकर यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षांसाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच दीपाली मासीरकर यांनी यापूर्वी मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर काम केले आहे. तसेच त्यांनी नागपूरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपयुक्तपदी देखील काम केले आहे. तसेच त्या नागालँडमधील कोहिम येथे सुद्धा कार्यरत होत्या. आता त्यांची निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरता संचालक म्हणून दिल्ली येथे नेमणूक केलेली आहे.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील रोलोआने दौपदी मुर्मू यांना तर विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. आज होणाऱ्या या निवडणुकीत भारतातील खासदार आणि आमदार असे एकूण ४८०० जण मतदान करतील. २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार असून नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -