घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर, दरडोई उत्पन्न वाढवण्याचे लक्ष्य

महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर, दरडोई उत्पन्न वाढवण्याचे लक्ष्य

Subscribe

Maharashtra Economy Survey | मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला आहे. यामध्ये २०२२-२३ च्या पूर्वानुमानुसार राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित करण्यात आली आहे. तर, राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात १०.२ टक्के वाढ, उद्योग क्षेत्रात ६.१ टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात ६.४ टक्के वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

२०२१-२२ मध्ये राज्याचे दरदोई उत्पन्न २ लाख १५ हजार २३३ होते. आता आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षांत २ लाख ४२ हजार २४७ रुपयांची वाढ अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याची महसुली जमा `४,०३,४२७ कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता ३,६२,१३३ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ३,०८,११३ कोटी आणि ९५,३१४ कोटी आहे. माहे एप्रिल ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा २,५१,९२४ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याचा महसुली खर्च ४, २७,७८० कोटी अपेक्षित असून सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता ३,९२,८५७ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 26.5 टक्के अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 22.0 टक्के अपेक्षित आहे. सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता एकूण महसुली खर्चातील विकासावरील खर्चाचा हिस्सा 67.8 टक्के आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -