Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्राची प्रगतीच्या वाटेवर घौडदोड; महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राची प्रगतीच्या वाटेवर घौडदोड; महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Subscribe

मुंबई : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि कामगार दिन (Labor Day) मोठ्या प्रमाणावर देशभरात साजरा होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, आज याप्रसंगी महाराष्ट्राच्या निमित्तीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्मांना मी भावपूर्ण आंदराजली अर्पण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे. त्याच स्मरण या पवित्र दिवशी करतो.

त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायाचं कर्तत्व ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले, क्रातीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपळ गणेश आगरकर, वीर सावरकर अशा अनेक वीभूतीनी खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला सामाजिक सुधारणांचा मार्ग दाखवला. 10 महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेलं आपलं युती सरकार हे याच थोर आणि महान व्यक्तीमत्वांनी दिलेल्या विचारांवर काम करतो आहे. आणि म्हणूनच सर्व सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही जनहिताचे शेकडो निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

ते म्हणाले की, शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, समाजातले वंचित आणि दुर्लक्षित यांना आनंदाचे दिवस दिसावे आणि त्यांची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी म्हणून आम्ही निर्णय घेतले. नैसर्गिक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे असो किंवा तरुणांना कुशल बनवून रोजगार देणे असो अडचणीतल्या प्रत्येक दुर्लभ घटकाला शासनाने मदत केली आणि करत राहणार आहे. एक उदाहरण द्यायचं तर गेल्या 10 महिन्यात मुख्यमंत्री वैदकीय साहाय्यता निधीमधून 50 कोटींपेक्षा जास्तीची मदत आम्ही गोरगरीब रुग्णांना केली. 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला आहे. आनंदाचा शिधा म्हणून शिधापत्रिका धारकांना केवळ 100 रुपयांत धान्य दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विकास करताना तो एकांकी राहणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. अवघ्या देशात उत्सुकेचा विषय ठरलेला एमटीएल पुल, कोस्टल रोड, मुंबई-पुण्याचे अंतर कमी करणार मिसिंग लिंक झपाट्याने पूर्ण करतो आहे. मेट्रोचे मार्ग सुरू होत आहेत, खड्डेमुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांना गती देतो आहे. शतेकऱ्यांना दिवसासुद्धा अखंडीत वीज मिळेल यासाठी सौरऊर्जा आपण करतो आहे. आमच्या प्रयत्नांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळ दिले आहे. केवळ घोषणा करून आम्ही थांबलो नाही, त्याची अंमलबजावणी कशी होईल असं पाहिलं आहे. जनतेसाठी सदासर्वदा उपलब्ध असणार आमचं सरकार आहे. यंदा तर आम्ही जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देऊन राज्याचा सन्मानदेखील वाढवला आहे. महाराष्ट्र हा प्रगतीच्या वाटेवर परत एकदा जोमाने घोडदौड करतो आहे. राज्याला देशात अग्रभागी ठेवण्याचे आमचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना वक्तव्य केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -