घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या महाप्रलयाची नोंद जागतिक पातळीवर! 'या' जिल्ह्यात विक्रमी पाऊस

महाराष्ट्राच्या महाप्रलयाची नोंद जागतिक पातळीवर! ‘या’ जिल्ह्यात विक्रमी पाऊस

Subscribe

राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांगलाच पाऊल पडला असून या पावसाच्या थैमानाने अनेक कुटुंब उध्वस्त केलेत. राज्यात पावसाने कहर केलं असून अकोल्यातही व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.. मुसळधार पावसाने अकोला शहरातील अनेक घरं पाण्याखाली गेले होती. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड, खडकी, डाबकी रोड, जुनेशहर, शिवसेना वसाहत या भागात पावसाचे पाणी साचले होते. या संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ५ ते ८ फुटापर्यंत पाणीच पाणी साचले होते. जिल्हातील अनेक भागात नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे कित्येक गावांचा संपर्क तुटला होता. हजारो हेक्टर शेती पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊन तो संकटात सापडला आहे.

२२ जुलैच्या पावसाची जागतिक पातळीवर नोंद

अकोला जिल्ह्यात गुरुवारी २२ जुलै रोजी झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याचे नाव हे जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. या दिवशी जिल्ह्यात १८४. ८ मिमि पावसाची नोंद झाली असून आजपर्यंतच्या इतिहासात अकोल्यात इतका पाऊस कधीच झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अकोला शहरात झालेल्या मुसळदार पावसामुळे संपूर्ण शहरात तारांबळ उडाली असून शहरातील, गीतानागर, खोलश्वर, खडकी, शिंदी कॅम्प, मोठी उमरी या परिसरात पाणीच पाणी असून शहराच्या मधोमध वाहणारी मोरणा नदी दुथडी भरून वाहत असून जिल्हा प्रशासनसकडून नदी काठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड अशा अनेक भागात या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

जिल्हा – पाऊस – टक्केवारी

  • बुलडाणा – ३५४.९ मिमी – १२५.९ टक्के
  • अकोला – ३४१.२ मिमी ११२.८ टक्के
  • वाशिम – ४९८.४ मिमी १४३.६ टक्के
  • अमरावती – ३९०.९ मिमी १११.२ टक्के
  • यवतमाळ – ५१०.६ मिमी १४५.८ टक्के
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -