Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणे ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

मागील काही दिवसांत राज्यभरात पावसाने तुफान बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांत राज्यभरात पावसाने तुफान बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून 3000 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग आहे. तर वेल्ह्यातील गुंजवणी धरणातून 3 हजार 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (Maharashtras most of dam overflow due to heavy rainfall vp96)

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

- Advertisement -

राज्याच्या अनेक भागांत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, पावसाची संततधार कायम असल्याने पूरस्थितीन निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याने आर्थिक नुकसना झाले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार राज्यभरात पावसाने हजेरी लावली असून धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याीतील डिंभे धरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून सध्या 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, पाणी विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुंजवणी धरण 100 टक्के भरले

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुंजवणी धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून 3 हजार 40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गुंजवणी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. शिवाय पावसाचा जोर असाच कायम राहिला तर, विसर्ग वाढविण्यात येणार आहे.


हेही वाचा – पालकांनो सावधान! मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -