Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महारेराने केली मुंबईसह रायगड, ठाण्यातील ११ विकासकांकडून 8 कोटी 57 लाखांची वसुली

महारेराने केली मुंबईसह रायगड, ठाण्यातील ११ विकासकांकडून 8 कोटी 57 लाखांची वसुली

Subscribe

महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वारंट्स वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे. महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती (Properties) जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. लवकरच राज्यात आणखी काही ठिकाणी असे लिलाव होणार आहेत. परिणामी आपली मिळकत जप्त होऊ नये, यासाठी आता काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसान भरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.

या पद्धतीने 20 वारंट्सपोटी मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 11 विकासकांनी 8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. महारेराने आतापर्यंत 624.46 कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी 1007 वारंट्स जारी केले आहेत. यापैकी आतापर्यंत 124 वारंट्सची 113.17 कोटीची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार बिडकाॅन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज अशा 5 विकासकांचा यामध्ये समावेश असून त्यांनी अनुक्रमे 4 कोटी 1 लाख 97 हजार, 57 लाख 84 हजार, 17 लाख 40 हजार, 37 लाख , 25 लाख 66 हजार 137 अशी एकूण 5 कोटी 39 लाख 87 हजार 137 एवढ्या रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. रक्कम जमा केलेली आहे.

यातील व्हिजन डेव्हलपर्स प्रकरणी मा. उच्च न्यायालयात समेट झालेला आहे. तर विधी रिअल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून, तडजोडीच्या प्रतींची उप निबंधकांच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून घेतलेली आहे. मुंबई शहरातील मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सदगुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही 3 वारंट्सचे अनुक्रमे 22 लाख 50 हजार, 15 लाख 75 हजार आणि 9 लाख 70 हजार 550 असे एकूण 47 लाख 95 हजार 550 जमा करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

अलिबाग भागातील(जिल्हा रायगड) विनय अग्रवाल या विकासकाकडे 13 वारंट्सपोटी नुकसान भरपाईची 1 कोटींच्यावर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी न्यायाधिकरणाकडे ( Tribunal) 78 लाख 85 हजार 431 रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. यातून 10 वारंटसची पूर्तता होणार आहे. ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन विकासकांनी तडजोड करून एकेक वारंटसपोटी अनुक्रमे 1 कोटी 19 लाख 58 हजार 728 आणि 71 लाख रूपये जमा केलेले आहेत. असे एकूण 11 विकासकांनी 20 वारंटसपोटी 8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रूपये जमा केलेले आहेत. काहींनी याबाबतचे दावे निकाली काढलेले आहेत.


हेही वाचा : BMC election : मोदींना तळ ठोकून बसायला सांगा; राऊतांचा खोचक


 

- Advertisment -