Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

Subscribe

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी (2 मे 2023) अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूरात अरुण गांधी यांचे निधन झाले असून, ते ८९ वर्षांचे होते. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी (2 मे 2023) अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूरात अरुण गांधी यांचे निधन झाले असून, ते ८९ वर्षांचे होते. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी माहिती दिली. (Mahatma Gandhi Grandson Arun Gandhi Passed Away In Kolhapur)

अरुण गांधी यांना लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते म्हणुनही ओळखले जात होते. अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच, त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती.

- Advertisement -

अरुण गांधी यांनी नंतर त्यांच्या आजोबांचा मार्ग अवलंबला आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले. अरुण गांधी यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे प्रमुख आहेत. अरुण गांधी 1987७ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.


हेही वाचा – बारसूत कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही लोक प्रयत्नशील; फडणवीसांचा आरोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -