Wine : सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.

mahavikas aghadi government cabinet decision permission to sell wine in super market said nawab malik
Wine : किरणा दुकान अन् सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्यात सुपर मार्केट, (Wine in super market)  दुकान आणि बेकरीमध्ये वाईन विकण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. राज्य मंत्रिमंडळात सुपरमार्केटमध्ये वाईन (wine) विकण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता सुपरमार्केटमधून वाईन खरेदी करता येणार आहे. राज्य सरकारने वाईन विकण्यास परवानगी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीमध्ये अनेक धोरण ठरवण्यात आली असून शिक्षण विभागासंबंधितही निर्णय घेतले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वायनरी असताना ते वाईन सुपरमार्केटमध्ये, १ हजार फुटापेक्षा मोठ्या दुकानात विकण्याची परवानगी देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

यापुढे वाईन उत्पादनावर बल्क लिटर मागे १० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. परंतु 1 हजार स्क्वेअर फिट पेक्षा अधिक जागेत असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोणत्या दुकानात मिळणार वाईन

राज्य सरकारने बेकरीमध्ये, सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वीच वाईन विकण्याच्या परवानगीबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक होते. राज्य सरकारने आता मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आलाय. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी असते. तसेच राज्यात अनेक बेकरीमध्ये वाईन वापरण्यात येते. परंतु वाईन सगळ्याच दुकानांमध्ये मिळणार नाही.

हजार फुटांपेक्षा कमी अंतराच्या दुकानात परवानगी नाहीच – मलिक

वाईन विक्री करण्यासाठी हजार फुटापेक्षा कमी अंतराच्या दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही. परंतु जे सुपरमार्केट आहे. त्या दुकानात वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

धार्मिक-शैक्षणिक संस्थांच्या परिसरात मुभा नाही

वाईन विक्री करणाऱ्या सुपर मार्केट आणि स्टोअर्सना शैक्षणिक तसेच धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहतील. या लायसन्ससाठी पाच हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येईल. दारुबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.

द्राक्ष-केळी-मधापासून वाईन

राज्यात सध्या फळे, फुले, केळी आणि मधापासून वाईन निर्मिती होते. वाईन निर्मिती अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यास असमर्थ आहेत. अशा वाईनरींमध्ये तयार केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना आणि पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.


हेही वाचा : रेशनवर मिळणार वाईन? लीटरमागे १० रुपये कर आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय